राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबई : महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ तिन्ही राज्यात व्हायरसमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. गुजरातचा चांदीपुरा व्हायरस, महाराष्ट्रात झिका आणि केरळात निपाह व्हायरसमुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात सध्या २८ झिका व्हायरस बाधित रुग्ण आढळून आले होते. केरळात निपाह व्हायरसमुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारने तिन्ही राज्यातील व्हायरसची वाढती डोकेदुखी लक्षात घेवून केंद्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन केली आहे. तिन्ही राज्यातील केंद्रीय यंत्रणेसोबत केंद्राची कमिटी बारकाईने काम करणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही राज्यांना खबरदारीच्या उपाय योजना घेण्याची सूचना दिली आहे. व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी आणि तांत्रिक बाबीवर मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कमिटी स्थापित केली आहे.
No comments