फलटण नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडे २ फायर फायटर बाईक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - फलटण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागास महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत अग्निशमन विभाग़ सक्षमीकरण करणेकामी तसेच शहरातील ज्या भागात अग्निशमन वाहन जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घाटना घडल्यास, सदर ठिकाणी तातडिने उपाय योजना करनेकामी, दोन फायर फायटर बाईक मंजूर करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या बुलेट आज फलटण नगर परिषदेमध्ये आज दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये दोन फोम सिलेंडर तसेच डीसीपी गॅसचा एक सिलेंडर देण्यात आलेला आहे. त्याचा उपयोग लहान आग विझविण्यासाठी होणार आहे. याचे पूजन मुखाधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्या हस्ते करणेत आले.
ज्या भागात अग्निशमन वाहन जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घाटना घडल्यास, तिथे तातडीने जाऊन आग विजवण्यासाठी या फायर फायटर बाईकचा उपयोग होणार आहे.
No comments