अवैध वाळू उपसा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल ; 10 लाख रुपयांचा मुद्देपाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.12 - ढवळ ता.फलटण हद्दीतील तलावातून अवैधरित्या वाळू चा उपसा करून त्याची वाहतूक करत असताना आढळून आल्याने, त्याच्याविरोधात गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १० लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१० ८/२०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ढवळ ता.फलटण हद्दीतील शिंदे नावाच्या तलावातून, विनोद राजेंद्र लोखंडे रा. ढवळ ता. फलटण यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैध वाळू उपसा करून, चोरटी वाहतूक करीत असताना सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली व १ ब्रास वाळू असा एकूण १० लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो तेथेच सोडून, त्या ठिकाणाहून पळून गेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बदने हे करीत आहेत.
No comments