फलटण येथे महिला बसमधून उतरताना सोन्याचे मंगळसूत्र चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - बारामती - फलटण बसमधुन फलटण एस.टी.स्टँण्ड येथे उतरत असताना, महिलेच्या बॅगमध्ये ठेवलेल्या पर्स मधून सोन्याचे मंगळसूत्र व मिनी मंगळसूत्र असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, एस.टी.स्टँण्ड फलटण येथे, पूजा अंकुश वाघ रा.मोळ ता. खटाव या बारामती - फलटण बसमधुन उतरत असताना, गर्दीचा फायदा घेवुन, वाघ यांच्या बॅगमध्ये ठेवलेल्या छोट्या पर्समधून, २० हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, व ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वाटीमधील पदक असलेले काळ्या मण्यामध्ये ओवलेले मणीमंगळसुत्र तसेच १० हजार रुपये किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व दीड ग्रॅम वजनाची सोन्याची शिंपल्याच्या आकाराची डोरली असलेले काळ्या मण्यामध्ये ओवलेले मिनी मणीमंगळसुत्र असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक पूनम बोबडे या करिता आहेत.
No comments