सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
सातारा दि. 10 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा व मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित एक धाव सुरक्षेची या उपक्रमांतर्गत सातारा येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी युवकांना मार्गदर्शक सूचना करून फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली.
विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यशवंतराव स्कूल ऑफ सोशल सायन्स, जकातवाडी येथील विद्यार्थी तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज मधील एनसीसी चे विद्यार्थी, सातारा शहरातील होमगार्ड आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स या संस्थेचे युवक व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, मॉर्निंग ग्रुप, विरंगुळा ग्रुप जिल्हा परिषद ग्राउंड यांनी सहभाग घेतल
यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल सायन्सचे प्रा.जीवन बोराटे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे एनसीसी विभागाचे कॅप्टन श्री. पवार, सातारा होमगार्ड विभागाचे केंद्रनायक तुषार वरांडे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पवार उपस्थित होते. यावेळी प्रथम तीन विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविणेत आले.
No comments