फलटणचा जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथील बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण ता. फलटण जि. सातारा यांना, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षापासून नावलौकिक मिळवलेला फलटण येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद पडलेला आहे. तो चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा, जनावरांच्या आठवडा बाजारामुळे तालुक्यातील शेतकरी व्यापारी व पशुपालकांची चांगली सोय होईल, तसेच मार्केट कमिटीमधील बंद असलेले गाळे पुन्हा निविदा काढून व्यवसायिकांना उपलब्ध करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी व जे गाळाधारक आहेत, त्यांनी पोटभाडेकरु ठेवून त्याचा गोडाऊन साठी वापर केला जात आहे तसे न करता व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करुन दयावेत, जेणेकरुन फलटणचा व्यापार वाढण्यास मदत होईल.
No comments