निंबळक येथे कुऱ्हाडीने हल्ला ; सख्खा भाऊ व पुतन्यांनी केली मारहाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.29 - निंबळक ता.फलटण येथे घरासमोरील व आजुबाजुला जेसिबिच्या साहय्याने साफसफाई करणाऱ्या भावास त्याच्या सख्या भावाने व पुतन्यांनी कुऱ्हाड व लाकडी दांडक्याच्या साहायाने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी निंबळक येथील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गजानन रामचंद्र चव्हाण वय ६५ रा. निंबळक ता.फलटण सध्या रा. लक्ष्मी नगर, फलटण हे दिनांक २२/८/२०२४ रोजी निंबळक येथे घरासमोर असलेले घाणघुण गवत काढण्यासाठी गेले असता, तेथे भाऊ प्रकाश आला व त्याने रामचंद्र चव्हाण यांना तेथे काम करण्यास अटकाव केला, त्यानंतर रामचंद्र तेथुन घरी निघुन गेले. त्यानंतर दिनांक २७/८/२०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारांस रामचंद्र चव्हाण ड्रायव्हर नामे कानिफनाथ शंकर कदम रा. सुरवडी ता. फलटण जि.सातारा याला घेवुन मौजे निबंळक ता. फलटण गावांचे हद्दीतील जमिन गट नंबर १२५ मधील असलेल्या घरासमोरील व आजुबाजुला जेसिबिच्या साहय्याने साफसफाई करीत असताना तेथे १) नितिन प्रकाश चव्हाण (पुतण्या) हातामध्ये काठी घेवुन, तसेच २) हेमंत प्रकाश चव्हाण (पुतण्या) हा त्याचे हातात लाकडी दांडा व लोखंडी पाते असलेली कु-हाड घेवुन तसेच त्याचेसोबत ३) भाऊ प्रकाश रामचंद्र चव्हाण हे हातात दगड घेवुन आले. त्यांनी प्रथम रामचंद्र यांना शिवीगाळ करून, नितीन यांनी रामचंद्र यांच्या पाठीवर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हेमंत याने त्याचे हातातील कुऱ्हाड रामचंद्र यांच्या डोक्यात मारून, त्यांना जखमी करून, गंभीर जखमी केले. त्यानंतर रामचंद्र हे जखमी झाल्याने खाली पडले. त्यावेळी भाऊ प्रकाश याने त्यांच्या पोठावर दगड मारला व हाताने मारहाण करीत असताना, रामचंद्र यांच्या कारवरील ड्रायव्हर कानिफनाथ कदम यांनी सोडवण्याचा प्रेयन केला तर त्यांनी रामचंद्र यांच्या ड्रायव्हर कानिफनाथ यालाही हाताने मारहाण केली. त्यानंतर रामचंद्र यांच्या डोक्यातुन रक्त प्रवाह झाल्याने ते बेशुध्द पडले. त्यानंतर ड्रायव्हर कानिफनाथ याने रामचंद्र याना कारमध्ये नेऊन लाईफ लाईन हॉस्पीटल येथे दाखल केले असल्याची फिर्याद रामचंद्र प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मठपती हे करीत आहेत.
No comments