वाठार निंबाळकर येथील बाबा सुपर बझार फोडला ; १ लाख ९७ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण - पुसेगाव रोडवर वाठार निंबाळकर गावचे हद्दीत श्री बाबा सुपर बाजारच्या लोखंडी पत्रा ऊस कुठून आत मध्ये प्रवेश करून आत मधील १ लाख ९७ हजार १७० रुपये किमतीचे किराणा मालाचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि.३/८/२०२४ रोजीचे रात्री ९ ते दि.४/८/२०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान वाठारफाटा ता. फलटण याठिकाणी फलटण ते पुसेगाव जाणारे रोडवर असणारे हणंमत भिमराव सरक रा. मिरगाव ता. फलटण व अश्विन दोशी यांच्या मालकीचा श्री बाबा सुपर बझारच्या लोखंडी पत्र्याचे शेडचा पत्रा उचकटुन, अज्ञात चोरटयांने बझार मध्ये प्रवेश करुन, बझार मधील किराणा मालाचे साहीत्य १ लाख ९७ हजार १७० रुपयाचे साहीत्य चोरुन नेले. यामध्ये १) ६५८०/- रुपये किमतीचे ०७ किलो काजु २) ८०००/- रुपये किमतीचे १० किलो बदाम ३)८६००/- रुपये किमतीचे १३ किलोचे गोवींद चे तुप ४) ४५०० रुपये किमतीचे १०० पोते किलो ५) २१०० रुपये किमतीचे १५ किलो खोबरे ६) ६२५० रुपये किमतीचे ५० किलो शेंगदाना ७) २१२० रुपये किमतीचे परीवार कंपणीचा चहा पावडरचे पॅक सुमारे १ किलो ८) ५७०० रुपये किमतीचे डाळी ९) ३६०० रुपये किमतीचे तांदुळ सुमारे ३० किलोचे पोते १०) ४५०० रुपये किमतीचे तांदुळ सुमारे ७० किलोचे पॉकींगमधील सुमारे किलोची किमंत ६५ रुपये ११) १३५० रुपये किमतीचे गुड डे कंपणीची बिस्कीट पुडे १२) ४८० रुपये किमतीचे संतुर साबण १३) ७५६० रुपये किमतीचे १८० किलो साखर १४) ४०४७० रुपये किमतीचे तेलाचे २३ डबे असा एकूण १ लाख ९७ हजार १७० रुपये किराणामालाचा समावेश होता.
No comments