आज फलटण येथे बौद्ध समाजाचा महामेळावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण - कोरेगांव विधानसभा राखीव मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची, समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाने संवाद अभियान सुरू केले. या संवाद अभियानास फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, आज दि.२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी १२.३० वाजता झांज पथक कार्यक्रम, दुपारी १ वाजता लेझीम पथक कार्यक्रम, दुपारी १.३० वाजता गायक संगीतकार सागर भोसले यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी २.३० वाजता महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, महामेळाव्यास सुरुवात करण्यात येईल. त्यांनतर शाहीर शितलताई साठे व सचिन माळी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होईल.
No comments