पोलिसांकडून प्रवाशी व वैद्यकीय अधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - रक्षाबंधन सनानिमित्त फलटण शहर एसटी स्टँड येथील विविध प्रवासी व फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांना राखी बांधून, पोलिसांनी भगिनींनी रक्षाबंधन सण साजरा केला.
या उपक्रमात सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, महिला पोलीस हवालदार सुलभा शेलार, पोलीस शिपाई स्वप्नील खराडे, पांडुरंग धायगुडे, समीरा शेख यांनी सहभाग घेऊन, फलटण एसटी स्टँड आवारात आलेल्या प्रवाशांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले तर उपजिल्हा रुग्णालयात लेखी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना राखी बंधन रक्षाबंधन सण साजरा केला.
No comments