चैन स्नॅचिंग : माळजाई मंदिराजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - माळजाई मंदिरा समोरील, डेक्कन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने महिला चालत जात असताना मोटारसायकल वरील दोन व्यक्तींनी, महिलेच्या गळ्यातील सात हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेल्या प्रकरणे दोन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास, माळजाई मंदिरा समोरील, डेक्कन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीमती माया काशिनाथ रोकडे वय-५२ वर्षे व्यवसाय-धुणीभांडी काम, रा.मंगळवार पेठ, समाजमंदिर जवळ, फलटण या चालल्या असता, मोटार सायकल वरील युवक ज्याने काळा टी शर्ट घातलेला, अंगाने सडपातळ असलेला व तोंडास रुमाल बांधलेला व दुसरा मोटार सायकल चालक इसम त्याचे अंगामध्ये लायनिंगचा पांढरा हिरवा शर्ट घातलेला व डोक्यात हेल्मेट असलेला यांनी, आपापसात संगनमत करुन, रोकडे यांच्या गळ्यातील सात हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र हिसकावून घेतले व मोटर सायकल वरून पळ काढला. हे दोन्ही युवक २० वर्षे वयोगटातील असून, गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार माधवी बोडके या करीत आहेत.
No comments