सरडे गावातील १८३ जणांवर गुन्हे दाखल - फॉरेस्ट ची कारवाई मुळात हिंदू मुस्लिम वाद नाहीच हा अतिक्रमणाचा वाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - मुळात हिंदू-मुस्लिम हा वादच नाहीये, हा अतिक्रमणाचा वाद आहे. सरडे गावामध्ये सर्वे नंबर ६७९ व सर्वे नंबर ८८ मध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे, व हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही कायदेशीर मार्गाने तक्रारी अर्ज दाखल केला आहे, त्याचबरोबर सौरभ सोनवले याची महाराष्ट्र शासनाने गोरक्षक म्हणून नियुक्ती केली असल्याचे अखिल भारत कृषी गोसेवा संघ व शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगतानाच काल सरडे ग्रामस्थांनी जो मोर्चा काढला तो चुकीचा व बेकायदेशीर असल्याचे सांगितले. दरम्यान विभागाकडे सरडे गावातील सर्वे नंबर.६७९ व सर्वे नंबर ८८ मध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले असल्याबाबत तक्रारी अर्ज देण्यात आला होता, त्या अनुषंगाने वनविभागाकडून आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी संबंधित अतिक्रमण केलेल्यां एकूण १८३ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज सौरभ सोनवले तसेच अखिल अखिल भारत कृषी गोसेवा संघ व शिवप्रतिष्ठान यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी फलटण तसेच वनविभाग यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की,
अखिल भारत कृषी गोसेवा संघ प. महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून मी सौरभ सोनवले राहणार फलटण प्रशासनातील विविध विभागांना फलटण तालुक्यातील सरडे गावातील सरकारी मालकीच्या फॉरेस्ट विभागाच्या असलेल्या सर्वे नंबर ६७९ वरील साधारण बारा एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात यावे म्हणून तक्रार अर्ज दिनांक ५/८/२०२४ रोजी केला होता तसेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी यावरती कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर काल दिनांक १३/०८/२०२४ रोजी फलटण प्रांत कार्यालय या ठिकाणी अतिक्रमणकर्ते, राजकीय स्थानिक पुढारी, काही पत्रकार यांच्या माध्यमातून बेधडक संघर्ष मोर्चा काढून अतिक्रमण हटवण्यात येऊ नये तसेच अतिक्रमणित घरे कायम करावी म्हणून मोर्चा काढण्यात आला तसेच अतिक्रमणित जागा ही खूप वर्षापासून अतिक्रमणित आहे असं सांगण्यात आलं परंतु काही स्थानिक लोकांची अतिक्रमन वगळता इतर अतिक्रमण हे बाहेर राज्यातून आलेल्या लोकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या आतील आहे तसेच यासंदर्भात आपण सॅटॅलाइट मॅपिंगच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. तरी काही मुद्दे मी आपल्यापुढे मांडू इच्छितो ते खालील प्रमाणेः
१) २०१० साली महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सरकारी मालकीच्या, पड जमीन,वन विभागाच्या, स्थानिक स्वराज्य संस्था मालकीच्या जमिनी जर कोणी अतिक्रमणित केले असतील तर तात्काळ गुन्हे दाखल करून त्या जमिनी सरकारने अतिक्रमण काढून ताब्यात घ्याव्या असा आदेश दिला आहे त्याची प्रत आम्ही यासोबत जोडत आहोत त्यामुळे तात्काळ हे अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर चुकीचा संदेश फलटण तालुक्यातील सामान्य जनतेपर्यंत प्रशासनाबद्दल जाईल.
२) काल काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काही भाषण कर्त्यांनी जोश मध्ये येऊन जशास तसे उत्तर देऊ अशी भाषा केली आहे तरी अर्जदार मी स्वता गोरक्षक श्री. सौरभ सोनवणे (मानद प्राणी कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य) माझ्या जीविकास धोका निर्माण झाला आहे तरी मला कायदेशीर संरक्षण द्याये.
३) अतिक्रमणकर्तेनी काढलेल्या मोर्चातील काही भाषणांमध्ये आम्ही स्वयंघोषित गोरक्षक आहोत असा उल्लेख करण्यात आला आहे तरी मला शासनाने केलेल्या नेमणुकी बद्दलचे ओळखपत्र मी सोबत जोडत आहे.
४) फलटण तालुक्यातील सरडे गावामध्ये गेल्या काही वर्षापासून जाणीवपूर्वक अतिक्रमण केलं जात आहे आणि त्यास स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ आहे. तसेच प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली असता या गावांमध्ये माजी सरपंचांच्या माध्यमातून या अतिक्रमणित जागेमध्ये बेकायदेशीर घरकुल योजना लोकांना दिली आहे यामागे आर्थिक गैरव्यवहार तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याचे वाटत आहे तरी या फॉरेस्ट विभागाच्या मालकीच्या अतिक्रमणित जागेमध्ये जर कोणत्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्यकाळामध्ये बेकायदेशीर घरकुल योजना दिली गेली असेल तर माजी सरपंच तसेच ग्रामसेवक यांची चौकशी व्हावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५) तरी हे सर्व प्रकरण पाहता प्रशासनाने कोणत्याही राजकीय तसेच सामाजिक दबावाला बळी न पडता कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती.
No comments