युवराज शिंदे मित्र मंडळाच्या वतीने फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट चे वाटप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - युवराज शिंदे मित्र मंडळ यांच्यावतीने फलटण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे म्हणाले की संपूर्ण फलटण शहरांमधील नागरिकांना दररोज अखंडितपणे वेळेत पाणीपुरवठा केला जावा यासाठी पाणीपुरवठ्याचे कर्मचारी ऊन वारा पाऊस याची कोणतीही पर्वा न करता काम करीत असतात हे आपण सर्वजण नेहमीच पाहत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्येबाबत कोणत्याही वेळी तक्रार आल्यानंतर मुसळधार पावसात देखील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे कर्मचारी रात्री अपरात्री आपले कर्तव्य पार पाङत असतात, प्रसंगी ते पावसात भिजल्यानंतर वारंवार आजारी पडत असल्याने त्यांचे आरोग्य बिघडत आहे, याची जाणीव आम्हा सर्व मित्रमंडळींना झाल्यानंतर, अशा कर्मचारी बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या कृतज्ञतेच्या भावनेतून पावसापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी रेनकोट वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला असून, समाजातल्या रंजल्या गांजल्या व उपेक्षित घटकासाठी यापुढे आम्ही असे उपक्रम राबवणार आहोत अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या .
यावेळी बोलताना मुख्याधिकारी निखिल मोरे म्हणाले युवराज शिंदे मित्र मंडळाच्या वतीने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटपाचा राबवण्यात आलेला उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून त्याबद्दल फलटण नगर परिषदेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून शिंदे यांनी असे उपक्रम नेहमी राबवावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी युवराज शिंदे मित्रपरिवाराच्या वतीने नूतन मुख्याधिकारी निखिल मोरे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी निलेश जगताप चेतन सूर्यवंशी गणेश जाधव महेश निकम दत्ता काळे शाहीर कोतवाल प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
No comments