कंपनीत भूमिपुत्रांना विना शिफारस कामावर घ्या - मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.29 - मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल जॅक्सन येथे महिंद्रा लॉजिस्टिक यांच्या वतीने नोकरी संदर्भामध्ये इंटरव्यू सुरू आहेत. फलटण तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी फलटण तालुक्यातील युवकांना कमिन्स कंपनी मार्फत युवकांचे अर्थिक शोषण करत आहे. या विरोधात आम्ही मुलांच्या पाठीशी उभे राहिलो आहे. व खरी परिस्थिती जनते समोर आणली. कंपनी मुलांना २४ हजार पगार देते. व एजंट मुलांना १२ हजार देतात व कामगारांचे अर्थिक शोषण करतात.त्यामुळे आज रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महिंद्रा कंपनीच्या या मॅनेजमेंट बरोबर चर्चा केली व तालुक्यातील मुलांना कंपनीच्या माध्यमातून कामांवर घेण्यात यावे. व मुलांना कंपनीचा पगार व इतर सुविधा नियमानुसार दिल्या गेल्या पाहिजेत व जास्तीत जास्त भूमिपुत्रांना कामावर घेतले पाहिजे, तालुक्यातील कोणत्याही नेत्याची शिफारस न घेता, मेरिट प्रमाणे नोकरी उपलब्ध करून दयावी अशा सुचना कंपनीच्या प्रशासनाला मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
यावेळी कंपनीचे वतीने तालुक्यातील भूमिपुत्रांना व कंपनी मध्ये व सर्व सुविधा दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलांनी माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील हजारो युवक उपस्थित होते.
No comments