Breaking News

11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सज्जनगड मॅरेथॉनची सर्वांना उत्सुकता

Everyone is excited about the Sajjangarh Marathon to be held on August 11

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - सातारा शहर व परिसर डोंगरमाथ्याने वेढला आहे. येथील नागरिकांसह खेळाडू किल्ले अजिंक्यतारा, चारभिंती परिसर, पेढ्याचा भैरोबा, जानाई-मळाई डोंगर, वा) सज्जनगड आदी ठिकाणी नियमित अथवा आठवड्यातून दोनदा तरी व्यायामासाठी जरूर जातात. विशेषतः यामध्ये विविध खेळातील राज्य, राष्ट्रीय खेळाडूंसह मॅरेथॉनपटूंचा अधिक भर असल्याचे दिसून येते. या खेळाडूंसाठी आणि साताऱ्यातील नागरिकांसाठी न सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ -आणि शाहूपुरीतील दिवेकर हॉस्पिटल र यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्टलासज्जनगड रन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

    या मॅरेथॉनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी तसेच गजाननराव बोबडे परळी आणि सज्जनगड येथील समर्थ सेवेकरी रामदास यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्यात तसेच मॅरेथॉन मधील स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व खेळाडूंनी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा द्याव्या असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे 

    या रनबद्दल माहिती देताना समर्थभक्त डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, "श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्याचा मंत्र द्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गजवडी (ता. सातारा) अभयसिंहराजे हायस्कूलपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा समारोप सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयानजीक होईल. १८ वर्षांवरील पुरूष व महिलांसाठी असलेल्या या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेतसंपूर्ण धावणमार्ग हा चढाचा असल्याने धावपटूंचा निश्चित कस लागेल; परंतु गडावरील पायऱ्या चढताना निसर्गरम्य परिसरामुळे धावपटूंना आनंद तरमिळेलच; पण त्यांच्यातील ऊर्जा समर्थ रामदासस्वामींनी महत्त्व पटवून देण्यासाठी साताऱ्यास राज्यात मारुती मंदिरांची स्थापना केली. सज्जनगड रन २०२४ च्या आयोजनाचा हेतू देखील नागरिकांचे  आरोग्य सुदृढ राहावे हाच आहे-समाजाला बलोपासनेचे यशाच्या टप्प्यापर्यंत नेईल,"असेही सांगितले.

    या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणाऱ्यांना स्पर्धेपूर्वी टी शर्ट, टी बॅच तसेच स्पर्धा पूर्ण झाल्यावर पट ऑनलाइन सर्टिफिकेट, रामवस्त्र,  (अल्पोपाहार) दिला जाणार आहे,  माहिती प्रवीण कुलकर्णी यांनी दिली.

No comments