नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फलटण मधील एकाची ४ लाख ३० हजारांची फसवणूक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - नोकरी लावण्याचे अमीष दाखवुन, वेळोवेळी पैशाची मागणी करुन, नोकरी लावण्याकरीता ऑनलाईन पैसे घेवून, फलटणमधील एकाची ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड,पुणे येथील विशाल तुकाराम खुले याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३/६/२०२३ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास भडकमकरनगर, फलटण येथे, अजिंक्य गणपतराव पिसाळ रा. भडकमकरनगर, फलटण यांना विशाल तुकाराम खुले, रा. रुम नंबर-२५/११, पर्वती नंदन. एस.एस.जी. सोसायटी, चिखली रोड, कृष्णानगर, मयुर हॉस्पीटलचे समोर चिंचवड, पुणे, यांनी, नोकरी लावण्याचे अमीष दाखवुन, अजिंक्य पिसाळ यांचा विश्वास संपादन करुन, वेळोवेळी पैशाची मागणी करुन, नोकरी लावण्याकरीता ऑनलाईन पैसे घेवून, ते परत न देता व नोकरी न लावता, ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद अजिंक्य गणपतराव पिसाळ यांनी दि.११/८/२०२४ रोजी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार नानासो होले हे करीत आहेत.
No comments