गणपतराव मोहोटकर यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - मॅग फिनसर्व कंपनी लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अनंता मोहोटकर यांचे वडील गणपत रामचंद्र मोहोटकर (अण्णा) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज दि १३/८/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कै. गणपत मोहोटकर यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. गणपत रामचंद्र मोहोटकर हे धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे, त्याच बरोबर ते फलटण पंचक्रोशीतील एक प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते.
No comments