चायना मांजामध्ये अडकलेल्या गव्हाणी घुबडाला केले मुक्त
फलटण (गंधवार्ता) - दि.१८ - दि.१५ ऑगस्ट २०२४ च्या स्वातंत्र्य दिना दिवशी लक्ष्मीनगर,फलटण येथून नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटण* या संस्थेच्या सदस्यांनी गव्हाणी घुबड(Indian Barn Owl) जातीच्या वन्य पक्षाला चायनीज मांजा मधे अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समजता वेळेवर घटनास्थळी पोहचून सुखरुपरित्या मुक्त केले व पुढिल उपचारासाठी वनविभागाला सुपूर्द केले.हे बचावकार्य संस्थेचे सदस्य पंकज पखाले,बोधीसगर निकाळजे,गणेश धुमाळ,शुभम गुप्ते यांनी स्थानिक नागरिक अविनाश शेवाळे,डॉ.अस्मिता भोई,निलेश साळुंखे व इतरांच्या मदतीने पार पडले.
तसेच या वेळी संस्थे तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले की अश्या प्रकारे वन्यपक्षी बंदी असलेल्या चायना मांजा किंवा धाग्या मधे अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावे. संपर्क क्र :-7588532023, 7020869867
No comments