खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्रीभैय्या युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१- फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब) पुरस्कृत व सह्याद्रीभैय्या युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी माढा लोकसभाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे, शिवसेना तालुका प्रमुख विकास नाळे, शहरप्रमुख निखिल पवार, फलटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव सर, फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब), उद्योजक अमित भोईटे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, अमोल भोईटे, पत्रकार ॲड. रोहित अहिवळे, वैभव गावडे, सागर चव्हाण तसेच प्रसिद्ध रिल स्टार शोना इंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बारामतीच्या शिवशंभो गोपळकाला संघाला ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व रविवार पेठ तालीम गणपती मंडळ, शिवशंभो गोपळकाला संघ बारामती व कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्वांचे आभार सह्याद्रीभैय्या युवा मंच चे अध्यक्ष सूरज कदम पाटील यांनी मानले.
No comments