स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण येथे महारक्तदान शिबिर - मॅरेथॉन स्पर्धा - वृक्षारोपण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त सहभागाने फलटण येथे शासकीय कार्यालये असलेल्या अधिकार गृह इमारती मधील तहसील कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिनी दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी महारक्तदान शिबिर व १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉन स्पर्धा व सकाळी ९ वाजता महारक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या दिवशी सर्व बंधु-भगिनींनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले आहे.
'हर घर तिरंगा' विद्यार्थ्यांच्या रॅली संपन्न
फलटण नगरपालिका व मुधोजी हायस्कुल व शहरातील सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने " हर घर तिरंगा " हा शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी फलटण शहरात शाळेतील विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री निखिल मोरे, गटविकास अधिकारी श्री चंद्रकांत बोडरे, गटशिक्षण अधिकारी व प्रशालेचे प्राचार्य श्री सुधीर अहिवळे सर,उपप्राचार्य श्री सोमनाथ माने सर मुधोजी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री देशमुख सर व सर्व न.प.कर्मचारी व सर्व केंद्रप्रमुख सर्व शाळेतील शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते रॅलीची सुरवात मुधोजी हायस्कुल येथुन करणेत आली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली करण्यात आली व रॅलीचा समारोप प्रशालेत करण्यात आला.
No comments