प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - गुणवरे ,तालुका फलटण येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्य विविध उपक्रम राबवत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण डॉ. प्रसाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट संचलन करून ध्वजाला सलामी दिली.
कार्यक्रमासाठी आमंत्रित पाहुण्यांचे, स्वातंत्र्यसैनिक व पालकांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. श्री. प्रसाद जोशी ( संचालक, जोशी हॉस्पिटल, फलटण) श्री. सुनील कापसे(संचालक, स्वराज ऍग्रो लिमिटेड ), डॉ.सौ. प्राची जोशी (प्रशासक जोशी हॉस्पिटल, फलटण) आजी-माजी स्वातंत्र्य सैनिक संघटना, गुणवरे, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. पांडुरंग पवार सर व सौ. सुलोचना पवार मॅडम ,संस्थेचे सचिव विशाल पवार सर,संचालक पांडुरंग गायकवाड सर तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. प्रियांका पवार मॅडम , प्रशालेचे प्राचार्य श्री. किरण भोसले सर , प्रशालेच्या समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम तसेच सर्व पालक वर्ग , शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम यांनी केले. त्यानंतर एल. के. जी., यु.के.जी., चौथी ,पाचवी तसेच आठवीतील विद्यार्थ्यांनी अतिशय मार्मिक आणि मनात देशभक्ती निर्माण करणारी भाषणे केली.
कार्यक्रमात मुलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी , डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमात इयत्ता तिसरी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध अशी कवायत सादर केली. विशेष म्हणजे छोट्या नर्सरी ,एल.के.जी व यु.के.जी च्या मुलांनी सुद्धा शिस्तबद्ध अशी कवायत सादर केली.
प्रोग्रेसिव्हच्या इ.७ वी, ८ वी व ९वी च्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावर आधारित अत्यंत सुंदर अशी नाटिका सादर करून सर्वांची मने जिंकली. तसेच इ. ६ वी, ७ वी व ८ वी च्या मुलांनी देशभक्तीपर गीतावर अतिशय सुंदर असं नृत्य सर्वांसमोर सादर केलं व सर्वांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमात पुढे पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुलांच्या या वेगवेगळ्या कलागुणांबद्दल पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही सतत असे कार्यक्रम घेत असतो. तसेच पालकांचेही आम्हाला सहकार्य लाभते हे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद जोशी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तेव्हा त्यांनी असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे व योग्य आहार घेतला पाहिजे. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या तसेच आरोग्यदायी सवयी असाव्यात. शाळेच्या यशाबद्दल तसेच मुलांच्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल,शाळेचे सचिव, संचालिका, प्राचार्य ,समन्वयिका ,सर्व शिक्षक वृंद ,पालक वर्ग व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ. सुषमा गौंड मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मोनाली मिसाळ मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.
No comments