डेक्कन चौक फलटण येथून लॅपटॉप व रोख रक्कम चोरीला
फलटण (गंधवार्ता) दि.१८ - डेक्कन चौक, फलटण येथील श्रीपाद मेडिकल स्टोअर मधुन लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप व रोख रक्कम १२ हजार रुपये असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, 15/08/2024 रोजीचे सायंकाळी 5.00 वा. चे ते दिनांक 16/08/2024 रोजीचे सकाळी 09.00 वा.चे दरम्यान डेक्कन चौक फलटण येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या शेजारील श्रीपाद मेडिकल स्टोअर मधुन, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मेडिकलमध्ये शिरून, १४ हजार रुपये किंमतीचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप व रोख रक्कम १२ हजार रुपये असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याची फिर्याद हरिष हणमंत बेडके रा. विडणी, ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आनंद भोसले हे करीत आहेत.
No comments