मुधोजी कॉलेज येथे एन. सी. सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ : मुधोजी कॉलेजच्या ग्राउंड वरती एन.सी.सी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण 100 कॅडेटची निवड करण्यात आली.
मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2024 -25 ची एनसीसी प्रथम वर्ष ( रेगुलर /FSFS ) प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती पार पडली. या प्रक्रियेसाठी अत्यंत काटेकोरपणे परीक्षा घेऊन प्रथम वर्षासाठी 100 कॅडेट ची निवड करण्यात आली . या निवड प्रक्रियेसाठी बावीस महाराष्ट्र बटालियन, एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमन्नार सेना मेडल , ॲडम ऑफिसर कर्नल नागेंद्र पिल्लेई, सुभेदार मेजर तानाजी भिसे, ट्रेनिंग जेसीओ संभाजी शिंदे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईकनिंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. पी एच कदम , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.ज्ञानदेव देशमुख , वरीष्ठ व कनिष्ठ विभागाचा सर्व स्टाफ यांनी एन.सी.सी प्रथम वर्षासाठी निवड झालेल्या सर्व कॅडेटचे तसेच प्रवेश प्रक्रीया यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल कॅप्टन संतोष धुमाळ व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
No comments