Breaking News

मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात दि. 23 व 24 आँगस्ट 2024 रोजी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Mudhoji Junior College. Organization of Monsoon inter-group sports competition on 23rd and 24th August 2024

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.22 - मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता  अकरावी व  बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. 23 ऑगस्ट व  शनिवार दि.24 ऑगस्ट 2024 या दोन दिवशी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर  करण्यात आले आहे.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार इयत्ता अकरावी व  बारावीच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार  होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा  घेण्याचा मुख्य हेतू आहे.

    या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ  शुक्रवार दि. 23  ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.30. वा. मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.पी.एच. कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे .व श्री.डी.एम.देशमुख उपप्राचार्य कनिष्ठ विभाग  हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत.

    या स्पर्धेमध्ये खो-खो (मुले, मुली), कबड्डी,(मुले, मुली),ॲथलेटिक्स- (100 मीटर व 400 मीटर धावणे) ,  , गोळाफेक  (मुले -मुली ) इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांचा  समावेश करण्यात आला आहे . या क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडू यांना प्राविण्य प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे.

    सदरच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेबद्दल  विद्यार्थ्यांना अधिक  माहिती  हवी असल्यास त्यांनी कनिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख श्री. शेंडगे टी. एम.  व  खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा  असे आवाहन कनिष्ठ जिमखाना विभाग समितीने केले आहे.

No comments