कुरेशी नगर फलटण येथे झाडीत टाकलेले नवजात बालक सापडले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - कुरेशी नगर, फलटण येथे झाडीमध्ये पुरुष जातीचे एक नवजात बालक टाकून निघून गेल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१/८/२०२४ रोजी रात्रौ ९.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर, मंगळवारपेठ, फलटण येथील गुरांच्या गोठ्याच्या पाठीमागे झाडीत, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, एक नवजात पुरुष जातीचे बालक याचे पालन त्याचा पुर्णता: परीत्याग करुन, त्यास उघड्यावर टाकुन निघुन गेले असल्याची फिर्याद इम्रान कुरेशी यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ या करीत आहेत.
No comments