मुधोजी दिनानिमित्त विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षक व खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या ७३ वर्धापन दिन तथा मधोजी दिनानिमित्त सर्व शाखांमधून सन २३-२४ यावर्षी विशेष गुणवत्ता प्राप्त शाखा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार प्रा.डॉ.शिवाजीराव कदम कुलपती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत.आमदार दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख उपाध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी, जगजीवन मिस्त्री उपाध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी, अशोक दोशी उपाध्यक्ष फलटण एजुकेशन सोसायटी, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी, रमणलाल दोशी व्हाईस चेअरमन गव्हर्निंग कौन्सिल फलटण सोसायटी,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी,हेमंत रानडे खजिनदार फलटण एज्युकेशन सोसायटी,अरविंद निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी, यांनी केले आहे.दरम्यान रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता अनंत मंगल कार्यालय शिंगणापूर रोड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
No comments