गळ्याला मांजा कापून एकजण जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण लोणंद रोड, रानडे पेट्रोल पंपाच्या समोर मोटर सायकल वरून जात असताना चालकाच्या गळ्याला व नाकाला मांजा कापल्यामुळे दुखापत झाल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.09/08/2024 रोजी सायंकाळी 6.00 वा चे सुमारास, दिपक अर्जुन लांडगे रा. सोनगाव, ता.फलटण हे सहाय्यक निबंधक ऑफिस, मार्केट यार्ड, फलटण येथील काम आटोपुन मोटार सायकलवरून घरी जात असताना, फलटण लोणंद रोडवर, रानडे पेट्रोलपंपाचे समोर कोणीतरी अज्ञात इसम पतंग उडवित असताना, पतंगीचा मांजा लांडगे यांच्या गळ्यास अडकुन, गळ्यास व नाकास जखम झाली आहे. अधिक तपास स.पो.फौ. अनिल भोसले हे करीत आहेत.
No comments