श्रीसंत नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - संतश्रेष्ठ श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त संत नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे श्री. संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७४ वा समाधी संजीवन सोहळा विठ्ठल मंदिर फलटण येथे आयोजित केला आहे, त्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे.
दि.०२/०८/२०२४ रोजी सकाळी ०६.३० वा. महाअभिषेक,सकाळी ०७.३० वा. नाष्टा व चहापान,स.०८.३० ते ११.३० - संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दुपारी १२ वा.फुले वाहणे व आरती होणार आहे.दुपारी ०१ ते ०३ -महाप्रसाद
सायंकाळी ०५ ते ०६ शिंपी समाजातील गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ व माजी प्राचार्य मा. रवींद्र येवले सर यांचे नामदेव महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान ,सायंकाळी ०६ ते ०७ - नवीन सभासद यांचा जाहीर सत्कार.रात्री ०७ ते ०८ - विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री. राजेश हेंद्रे यांचेकडून प्रितीभोजन आयोजित करणेत आले आहे.तरी समस्त नामदेव शिंपी समाजबांधव , भगिनी व मुले मुली यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजेश हेंद्रे व सन्माननीय प्रतिनिधी मंडळ श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments