कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Organized various programs on the occasion of the memorial day of Subhashrao Namdevrao Suryavanshi (Bedke).
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे माजी अध्यक्ष कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त 21 ऑगस्ट 2024 रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .या कार्यक्रमांमध्ये नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक वृंद, गुणवंत विद्यार्थी ,खेळाडू ,यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. त्याचबरोबर सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज डिजिटल क्लासचे उद्घाटन. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)महाविद्यालय बी एस सी भाग 1 शुभारंभ व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) उपाध्यक्ष मा .श्री. बापूसाहेब मोदी सर उपाध्यक्ष श्री सी .एल .पवार सर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा .श्री डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मा .श्री महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) ,श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या सौ.ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बडके) श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मा श्री शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), मा श्री प्रकाश तारळकर सर ,मा श्री हनुमंतराव निकम ,श्री मंगेश शेठ दोशी सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक ,प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत
No comments