फलटण शहर पोलीस व निर्भया पथकाकडून मुधोजी हायस्कूल परिसरात कारवाई ; २८ केसेस दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - सकाळी ०९.०० वाजता ते ११.३० वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण शहर येथे फलटण शहर पोलीस ठाणे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांच्याकडील निर्भया पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोटर वाहन कायद्यांतर्गत २८ केसेस करून रू.१९४००/- दंड आकारण्यात आला आहे. आणि १९ विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि १३ व्यक्तीवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कारवाई केली आहे.
या कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो.शि.पांडुरंग धायगुडे, ऋषिकेश खरात, मारुती लोलापोड, संभाजी जगताप, सुरज परिहार आणि निर्भया पथकतील महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलीस नाईक फैयाज शेख, पो.शि. दत्तात्रय भिसे, संध्या वलेकर यांनी सहभाग घेतला.
No comments