Breaking News

फलटण ग्रामीण पोलिसांची चोरटी दारू विकणाऱ्यांवर कारवाई ; ४ ठिकाणी छापे

Phaltan rural police action against those who sell illegal liquor; Raids at 4 locations

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - फलटण तालुक्याच्या पूर्व भागात गुणवरे, मिरढे, सोनवडी बुद्रुक, वडले गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांच्या पथकाने चोरटी दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करून, विविध ठिकाणी छापे टाकून चौघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले व चोरटी दारू जप्त केली. दरम्यान या चोरटी दारू विक्री शोध मोहिमेत दोन अधिकारी व दहा कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून, अद्याप मोहीम चालू असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी कळवले आहे.

    बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  मौजे  मिरढे ता. फलटण गावच्या हद्दीची इसम नामे कैलास पांडुरंग चव्हाण राहणार नाईकबोमवाडी  तालुका फलटण जिल्हा सातारा. हा हॉटेल काजलच्या  अडोशास उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ८४०/- रुपयांचा देशी दारूच्या २४ बाटल्या मिळून आल्या, त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ प्रमाणे कारवाई केली. 

    मौजे सोनवडी बुद्रुक ता. फलटण गावच्या हद्दीची इसम नामे सुरेश भगवान चव्हाण राहणार सोनवडी बुद्रुक ता. फलटण  हा त्याचे राहते घराचे आडोशाला उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ५६०/- रुपयांचा देशी दारूच्या १६ बाटल्या मिळून आल्या त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई केली आहे.

    मौजे  वडले तालुका फलटण गावच्या हद्दीची इसम नामे दादासो पांडुरंग सोनवलकर राहणार वडले तालुका फलटण जिल्हा सातारा. हा पाटील नावाच्या शिवारात पत्र्याचे शेडचे आडोशाला उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ४५५/- रुपयांचा देशी दारूच्या १३ बाटल्या मिळून आल्या त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ ( ई)प्रमाणे कारवाई केली आहे.

    मौजे गुणवरे तालुका फलटण गावच्या हद्दीची इसम नामे विलास आनंदराव जाधव वय ४५ वर्ष राहणार गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारा. हा त्याचे राहते घराचे अडोशास उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ९४०/- रुपयांचा देशी दारूच्या १३ बाटल्या मिळून आल्या त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ प्रमाणे कारवाई केली आहे.

No comments