Breaking News

फलटण येथे फलटण तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Phaltan taluka level school chess competition concluded at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण येथे फलटण तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धा १४,१७, व १९ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्यात खेळवण्यात  आल्या.  प्रत्येक वयोगटातून जिल्ह्यासाठी पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. 

    दि. २७ व २८ ऑगस्ट रोजी सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल,फलटण येथे बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संदीप ढेंबरे सर, प्रा.तायाप्पा शेंडगे सर, लालासो भोसले सर, प्रदीप चव्हाण सर, हिंदूराव लोखंडे सर, उत्तम घोरपडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

    फलटण तालुक्यातील विविध शाळांमधून   मुले ९२ व मुली ४२ असे एकूण १३४ स्पर्धक सहभागी झाले होते. मुलांची स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तर मुलींची स्पर्धा २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय बुद्धिबळ पंच नझीर काझी सर यांनी काम पाहिले. बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पंच म्हणून अक्षय कांबळे तेजस गोरे व प्रज्ञा गांधी काम पाहिले.

    प्रत्येक वयोगटातील विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे आहेत.
१९ वर्षाखालील गट मुले -
१. सिद्धांत साळुंखे, मुधोजी हायस्कूल जुनियर कॉलेज.
२. शिवम शिरतोडे, सस्तेवाडी 
३. प्रथमेश तेली, सरकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल 
४. सुमित कदम, मुधोजी महाविद्यालय.
५. चारुदत्त जाधव, सहकार महर्षी हणमंतराव पवार पवार हायस्कूल

१९ वर्षाखालील मुली -
१. ज्योती शिंदे, मुधोजी महाविद्यालय 

१७ वर्षा खालील गट मुले
१. गौरव बोराटे, सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूल 
२. साहिल सुळ, मुधोजी हायस्कूल 
३. मिथिलेश तांबे, मुधोजी हायस्कूल 
४. विशाल वळकुंडे, पवारवाडी आ
५. ईशान मेनसे, श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई 

१७ वर्षाखालील मुली
१. आफरीन शेख, मुधोजी हायस्कूल जुनियर कॉलेज 
२. माही शहा, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई 
३. ज्योत्स्ना शिंदे, सस्तेवाडी 
४. सलिहा शेख, ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल 
५. निकिता केंजळे, सस्तेवाडी

१४ वर्षाखालील मुले
१. अवधूत पवार, वाघोशी 
२. श्रीनाथ निंबाळकर, आनंदवन शाळा 
३. कार्तिक शिंदे, पवारवाडी आसू 
४. अथर्व खटके, खटके वस्ती 
५. समर्थ खटके, खटके वस्ती

१४ वर्षाखालील मुली
१. प्रियंका गांधी, कमला निमकर बालभवन 
२. प्रज्ञा गांधी, मुधोजी हायस्कूल 
३. शामल आडके, निरगुडी 
४. श्रेया वळकुंडे, खटके वस्ती 
५. मधुरा गुजर, मुधोजी हायस्कूल

No comments