पोपटराव बर्गे यांच्या पुस्तकाची शासनाच्या ‘ग्रंथ भेट’ योजनेत निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - येथील इतिहास अभ्यासक राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ भेट’ योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्यावतीने देशातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ समृद्ध करण्याचे व त्याद्वारे ज्ञानप्रसार करण्याचे कार्य केले जाते. त्यानुसार राबवण्यात येणार्या ‘ग्रंथ भेट’ योजनेमध्ये सन 2021 - 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून पोपटराव बर्गे यांच्या ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ या पुस्तकाची निवड झाली आहे. त्यामुळे बर्गे यांचे सदरचे पुस्तके देशातील सर्व शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकीक कार्याला उजाळा देणार्या या पुस्तकाची शासकीय योजनेमध्ये निवड झाल्याबद्दल लेखक पोपटराव बर्गे यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, इतिहास अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंगतात्या बलकवडे, पानिपतच्या सभा मंडळाचे प्रचारक अरुणकाका पायगुडे, विक्रम बर्गे, पंडितदादा मोडक, श्रीमती विजयाताई भोसले, प्राचार्य रवींद्र येवले, प्रा.डॉ.सौ.माधुरी दाणी, मोडी अभ्यासक पांडुरंगदादा सुतार, श्रीमती शारदाताई निंबाळकर, नाणी अभ्यासक सचिन यादव, डॉ.सुहास म्हेत्रे, साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments