खा.शरदचंद्र पवार यांना संविधान समर्थन समिती फलटणच्या वतीने निवेदन व निमंत्रण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - खा.शरदचंद्र पवार यांची पुणे येथील मोदीबाग या ठिकाणी संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून भेट घेऊन नंदकुमार मोरे यांनी निवेदन व निमंत्रण दिले.
२५५ - फलटण कोरेगांव विधानसभा मतदारसंघातीलआगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फलटण येथे दि. २५ ऑगस्ट रोजी एकच निर्धार, बौद्ध आमदार! या अनुषंगाने फलटण मध्ये होत असलेल्या बौद्ध समाजाचा मेळाव्या संदर्भात निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी खा शरद पवार यांनी शुभेच्छा व्यक्त करत, फलटण तालुक्यातील दलित चळवळीतील कार्यकर्ते यांना बारामती येथे भेट देण्याबाबत सकारात्मकता दर्शवत आनंद व्यक्त केला. शिष्टमंडळास बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणी भेटीचे निमंत्रण दिले आहे व २५ ऑगस्ट ला मोबाईल फोन द्वारे शुभेच्छा व्यक्त करणार आहेत.
यावेळी आ.रोहितदादा पवार यांनी देखील आनंद व्यक्त केला व सदर मेळाव्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
No comments