धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे 8 टन निर्माल्य गोळा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 19 : रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल ( नाना पाटील चौक ) येथे अनंत चतुर्थी दिवशी 8 टन निर्माल्य गोळा करण्यात आले.
मंगळवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले . अंदाजे 8 टन निर्माल्य सकाळी 7.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यत 300 ते 350 श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले .पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने गेल्या 9 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो .निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे . या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
No comments