मुधोजी हायस्कूलचे 9 शिक्षक व 2 कर्मचारी गुणवंत पुरस्काराने सन्मानित
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.13 - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून, शाळे अंतर्गत गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी आणि गुणवंत सेवक असे प्रशालेतील विविध विभागामध्ये उत्तम काम करणाऱ्या एकुण नऊ शिक्षकांना गुणवंत शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवंत कर्मचारी आणि एक सेवक वर्गांतील सेवकास गुणवंत सेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.
गेल्या काही वर्षापासून खंडित झालेली पुरस्काराची ही परंपरा मागील वर्षा पासून पुन्हा सुरू करण्यात आली असून, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे प्रशालाचे प्राचार्य मा .श्री सुधीर अहिवळे यांनी सांगितले.
सन 2024 -2025 सालच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने खालील विभागातील शिक्षकांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
किमान कौशल्य विभागातून :-
विभागप्रमुख श्री राजेंद्र रणसिंग
उच्च माध्यमिक विभागातून :-
श्री संदीप पवार व सौ. वनिता लोणकर
दुपार विभागातून :-
श्री शामराव आटपाडकर व सौ. दिपश्री घाडगे, सौ. शारदा निंबाळकर,
सकाळ विभागातून :-
श्री सचिन धुमाळ , कु . तृप्ती शिंदे , सो.वैशाली रसाळ
शिक्षकेतर कर्मचारी विभागातून :-
श्री नितीन भोसले
सेवक वर्गातून :-
श्री राजेंद्र मुळीक
वरील सर्वांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्तींचा परिचय व त्यांच्या सन 2024 - 2025 च्या विशेष कामाची माहिती यावेळी देण्यात आली .व यावेळी माननीय प्राचार्य सुधीर ऐवळे यांच्या शुभहस्तेसन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलेव पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलतांना मा.प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी सांगितले की आपण चांगले काम केले असता आपण पुरस्काराचे मानकरी हे होतच असतो पण आपण केलेल्या कामाचा आदर्श व प्रेरणा इतरांनी घेऊन तसेच काम यापुढील काळात करून त्या आदर्शावर चालावे व इतरांनी प्रेरीत करावे असे प्रतिपादन यावेळी केले.
यावेळी या कार्यक्रमास मुधोजी हायस्कूल चे उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील , शिक्षक प्रतिनिधी श्री संतोष तोडकर ,श्री थोरात मॅडम व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी वरील सर्वांनी पुरस्कार विजेत्या सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments