आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटलला धडा शिकवणार ; सचिन मोहिते यांचा आरोग्य यंत्रणांना इशारा
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - राज्य शासनाने सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम व मोफत उपचार देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केली आहे . जावली तालुक्यातील ही योजना लागू असलेल्या एका हॉस्पिटलने रुग्णाला कल्पना न देता खाजगी उपचार देऊन त्याचे तीन लाख रुपये बिल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . या गैरप्रकारा संदर्भात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी हा प्रकार जिल्हाशल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांच्या निदर्शनास आणून देत असे गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटल्स व सानियंत्रण आस्थापनांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
जावली तालुक्यातील रुग्ण अनिल जाधव यांच्या प्रकरणात हा प्रकार उघडकीस आला , सदर हॉस्पिटल योजनेत असून देखील त्याची माहिती रुग्णाला न देता त्याचे उपचार खासगी स्वरूपात करून 3 लाख रुपये पर्यंत बिल करण्यात आले , याची माहिती शिवसेना पदाधिकारी यांना मिळाल्या नंतर त्यांनी तत्काळ हॉस्पिटल गाठले परंतु तेथील मॅनेमेंट ने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले, याची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ करपे तत्काळ या ठिकाणी पोहचले व त्यांनी आंदोलकांची चर्चा करून हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले त्या सोबत जिल्हाप्रमुख व सहकाऱ्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
हे गैर प्रकार थांबवले नाही तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला हॉस्पिटल प्रशासनाने समंज्याशाची भूमिका करून रुग्णाचे सर्व बिल माफ केले या प्रसंगी तालुका प्रमुख नितिन गोळे, सागर रायते, सुनील पवार ,प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे , इम्रान बागवान, प्रशांत शेळके, हरी पवार, उमेश दुर्गावळे, रवी पार्टे , अमोल गोसावी, बापू गोळे रुग्ण नातेवाईक सौ जाधव व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
No comments