Breaking News

सासकलच्या सुपर केन नर्सरीला फलटण तालुक्यातील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची भेट

A visit by Mandal Agriculture Officers of Phaltan Taluk to Saskal's Super Cane Nursery

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१-  कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सासकल ता. फलटण येथे सुपर केन नर्सरी तयार करण्यात आली आहे. ऊसाचे एकरी शंभर टन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डॉ. बाळकृष्ण जमदागणे सुपर के नर्सरी जनक यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी विभागामार्फत सासकल येथील शेतकऱ्यांना सुपर केन नर्सरीच्या तंत्रज्ञान बाबत शेतकरी मेळावे प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिकाद्वारे, शेतकऱ्यांमध्ये नर्सरी बाबत प्रचार व प्रसार करून, शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञान  बाबत प्रोत्साहित करून सासकल गावामध्ये एकूण  ५  शेतकऱ्यानी सुपर केन नर्सरी तयार केली आहे.

    सासकलच्या या सुपर केन नर्सरीला फलटण तालुक्यातील मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी संतोष मुळे व मच्छिंद्र मुळीक या शेतकऱ्यांच्या सुपर केन नर्सरी द्वारे तयार करण्यात आलेल्या ऊस रोप लागवड प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांचे अभिनंदन  मंडल कृषी अधिकारी यांनी केले.

    सुपर केन नर्सरी मध्ये २१ दिवसात रोप तयार होते ४.५ फूट सरी अंतर असून २ फूट दोन रोपातील अंतर ठेवून लागवड करण्यात आली आहे.

    यावेळी मंडल कृषी अधिकारी फलटण सतीश निंबाळकर,मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, मंडल कृषी अधिकारी तरडगाव पूजा दुदुस्कर, कृषी पर्यवेक्षक अशोक जगदाळे, कृषी पर्यवेक्षक तरडगाव महावीर पवार तसेच कृषी सहाय्यक सेवा रत्न पुरस्कार  सचिन जाधव  तसेच शेतकरी उपस्थित होते.

No comments