बैलगाडा शर्यत मैदानावर मारहाण ; ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - जाधववाडी, फलटण येथे भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत मैदानावर बैलगाडी एकाच गटात पळवु नको असे म्हणत, फलटण येथील एकाला नऊ जणांनी, कोयता, काठी, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोऱ्हाळे ता. बारामती येथील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२५/९/२०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, मौजे जाधववाडी, ता. फलटण, येथील साईबाबा मंदिरासमोर डॉ. किरण शेंडे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती, बैलगाडी एकाच गटात पळवु नको असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करुन १) मारुती पांडुरंग खोमणे, २) ऋषी तानाजी जाधव, ३) विशाल विठ्ठल कडाळे, ४) शामराव मदने (पुर्ण नाव माहीत नाही),५) हनुमंत शिवाजी जाधव, ६) तेजस मारुती खोमणे व इतर तीन असे सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे या सर्वांनी मिळून, विजय बबन मदने, वय- ३५ वर्षे रा. उमाजी नाईक चौक, फलटण, ता. फलटण, जि. सातारा यांना कोयत्याने, काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी खाली पाडुन मारहाण करुन जखमी करुन, शिवीगाळ, दमदाटी केली असल्याची फिर्याद विजय बबन मदने यांनी दिली आहे. अधिक तपास म.पो.ना. पूनम तांबे या करीत आहेत.
No comments