भुसार आणि कांदा अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी चेतन घडिया
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - १ सप्टेंबर २०२४ रोजी फलटण भुसार आणि कांदा अडत व्यापारी असोसिएशन फलटणची बैठक संपन्न होऊन असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री चेतन घडिया, उपाध्यक्षपदी राजेश शहा, आ़णि सचिवपदी श्री धिरेन शहा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
व्यवसायिक स्पर्धे मध्ये अस्तित्व टिकवून ठेवणे आणि असोसिएशन बळकट करणे एकच उदिष्ट ठेवून असोसिएशनचे कामकाज करणार असल्याचे अध्यक्ष चेतन घडीया यांनी सांगितले.
या निवडून बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे संचालक समर जाधव, उद्योजक राम नाईक निंबाळकर,व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजकुमार मेहता माजी सचिव शशिकांत दोशी,असोसिएशन सदस्य धनेश शहा, सचिन दोशी, सुरेन्द्र दोशी , सनद दोशी, माऊली भोसले, बाळासाहेब विर, सागर दोशी, राजेंद्र बर्डे, राजेंद्र सुर्यवंशी, बुवासो भोसले, मनसुकलाल शहा, विलास माने, कपिल दोशी, अजितकाका शहा,अजय शहा, प्रमोद जगताप, इत्यादी व्यापारी सदस्यांनी अभिनंदन केले.
No comments