छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा गल्ली, फलटण या मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्तीकडे वाटचाल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा गल्ली, फलटण या मंडळाची यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे गणेश भक्तांच्या आशिर्वादामुळे वाटचाल होत असून छत्रपती गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७५ साली झाली असून यंदाच्या वर्षी हे मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करीत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे मंडळ प्रतिवर्षी श्रीं'ची आकर्षक मुर्तीची प्रतिष्ठापना करीत असते यामुळे या मंडळाला अनेक वर्षापासून श्रीं'च्या मुर्तीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
यंदाच्या वर्षी या मंडळाने फलटण मध्ये प्रथमच शिवपुत्र तथा श्री गणरायाचे जेष्ठ बंधू सारथी भगवान "कार्तिक स्वामी" यांच्या वाहन मयूर मोरावर आरुढ झालेली श्रीं'ची आकर्षक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
ही मूर्ती मुर्तीकार श्री.गणेश जाधव, गण संकुल, आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, करी रोड, लालबाग, मुंबई येथून आणण्यात आली आहे.
ही मुर्ती पाहण्यासाठी फलटण शहरातून व तालुक्यातील असंख्य भावीक भक्त येत आहेत.
No comments