दालवडी गावातील शिधापत्रिका धारक कुटूंबातील सदस्यांची ई-केवायसी पूर्ण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 23 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी दिलेल्या सुचनेनुसार रास्तभाव दुकानदार यांनी आपल्या दुकानाला जोडणेत आलेल्या अंत्योदय व पी. के. एल. शिधापत्रिका धारक यांचे कुटूंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मौजे दालवडी येथील रास्तभाव दुकानदार यांनी दि. २२/९/२०२४ रोजी श्री. अभिजित जाधव तहसीलदार फलटण यांचे अध्यक्षते खाली श्री. प्रशांत कांबळे पुरवठा निरीक्षण अधिकारी, श्री. मनोज काकडे, श्रीमती अश्विनी पोहारे पुरवठा निरीक्षक फलटण यांचे मार्गदर्शना खाली श्री. अमोल रोकडे पॉस ऑपरेटर, श्री. गणेश गायकवाड ऑपरेटर, निलेश धाईंजे ऑपरेटर रास्तभाव दुकानदार मुंजवडीश्री. बापुराव ठणके , रास्तभाव दुकानदार मांडवखडक श्री. यशवंत घोरपडे , रास्तभाव दुकानदार बोडकेवाडी श्री. वसंत भांडवलकर , रास्तभाव दुकानदार हणमंतवाडी श्री. महादेव माने , रास्तभाव दुकानदार सस्तेवाडी श्री एस. बी जाधव , रास्तभाव दुकानदार तरडगाव बाळासाहेब मोहिते यांनी रास्तभाव दुकानदार दालवडी अनुप गायकवाड यांच्या सहकार्याने मौजे दालवडी येथील शिधापत्रिका धारकाचे ई केवायसी पूर्ण केले. सदर कामामध्ये श्री. सुनील मदने, श्री. हरीशचंद्र ठणके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments