फलटण मध्ये चालक दिन उत्साहात साजरा
फलटण (प्रतिनिधी) - फलटण मध्ये चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी चालक दिवस 17 सप्टेंबर रोजी संपन्न होतो.
यावेळी सर्व चालक व मालकांचा सत्कर घेण्यास आला . त्याप्रसंगी प्रकाश खटावकर मोटार वाहन निरीक्षक फलटण , अक्षय खोमणे मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक , विशाल थोरात मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक हे उपस्थित होते.
तसेच स्कूल बस संघटना अध्यक्ष चंद्रकांत मोरे आणि दत्ता भोसले यांच्या आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश आहीवळे आणि सनी कदम यांनी रिक्षा संघटनेच्या वतीने खटावकर याचा सत्कार करुण त्यांना चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विजय भोंडवे यांनी आभार मानले, उदय काकडे,फलटण तालुक्यातील रिक्षा चालक आणि स्कूल बस चालक उपास्थित होते.
No comments