Breaking News

ठोसेघर रस्त्यावर कार दरीत कोसळून पाच जखमी

Five injured when a car fell into a ravine on Tosheghar road

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चार चाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला  सुमारे 200 फूट खोलदरीत कोसळली .हा अपघात शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान झाला . घाटातील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने वेगात असलेली कार दरीत गेल्यांची पोलीस सूत्रांची माहिती आहे . या अपघातात बाणेर व रहाटणी ( पुणे जिल्हा) येथील पाच जण जखमी झाले आहेत .जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

    तेजस सचिन भोळे वय २३रा नादबंगला बाणेर ता हवेली जि पुणे, चालक नाद अनिल पाटील वय २९ नेहा नाद पाटील वय २८ हवेली जि पुणे, सिद्धार्थ भानुप्रकाश शर्मा वय २९ रा रॉयल सोसायटी रहाटणी,ता हवेली जि पुणे, खुशबू घनश्याम शर्मा वय २८ रहाटणी पुणे अशी जखमींची नावे आहेत .सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही .सविस्तर घटना अशी की पुणे येथील पर्यटक ठोसेघर चाळकेवाडी परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते . तेथून सुमारे साडे अकराच्या दरम्यान परत येत असताना ज्या ठिकाणी उरमोडी धरणाचा व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेघर वरून सातारच्या दिशेने येत असताना दरीचा अंदाजकार चालक नाद पाटील याला न आल्याने कार  थेट रस्ता सोडून खोल दरीत कोसळली. ही घटना या ठिकाणी उभी असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी तात्काळ ही घटना राजू भैया भोसले तसेच पोलीस निरीक्षक तांबे यांना कळवली त्यांनी तात्काळ मदतीसाठी चक्र फिरवली खोल दरीत जाऊन. 

    अंबवडे येथील नितीन देशमुख ,निलेश देशमुख ,सागर देशमुख, विजय जिमन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार संदीप कर्णे यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली .गाडीतील दोन युवक एक महिला जास्त जखमी होती  भेदरलेल्या जखमी महिलेला त्यांनी दिलासा देत बाहेर काढले तसेच जखमींना ॲम्बुलन्सने साताऱ्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले .जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने सुदैवाने जखमींचे प्राण वाचले.

No comments