माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा फलटण तालुका दौऱ्यावर
Former Union Minister Bhagwant Khuba on tour of Phaltan Taluka
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा हे उद्या दि.२१ रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. ते महायुतीचे पक्षातील काही पदाधिकारी , पक्षाचे पदाधिकारी यांना भेटणार आहेत. १ वाजता प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या निवास स्थानी भेट २) २ वाजता मोहनराव रणवरे मलठण यांच्या निवासस्थानी भेट तसेच ३) दत्ता अहिवळे सर मंगळवार पेठ यांच्या निवासस्थानी भेट व शाळेला भेट ४) श्रीराम बाझार संस्थेस भेट, ५) मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांच्या निवासस्थानी भेट ६) जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या दुधेबावी निवासस्थानी भेट व तेथून दहिवडीकडे प्रयाण होणार आहे. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
No comments