विद्यानगरचा राजाची १०१ महिलांच्या हस्ते महाआरती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - विद्यानगर गणेश उत्सव सांस्कृतिक क्रीडा मंडळ फलटण च्या वतीने विद्यानगरचा राजाची महाआरती मान महिलांना देत, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्यासह १०१ महिलांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली.
विद्यानगर गणेश उत्सव सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष धीरज कचरे यांच्या संकल्पेनेतून प्रथमच १०१ महिलांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध कार्यक्रमचे नियोजन करण्यात आले होते. डान्स स्पर्धा, फॅशन शो, संगीत खुर्ची, रनिंग स्पर्धा, लिंबू चमचा, एक मिनिट शो, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले होते.
No comments