Breaking News

प्रजा गटाच्या माध्यमातून जावली ता. फलटण येथील डिपी पुन्हा सुरु : प्रदीप झणझणे

go-through-praja-group-dp-from-phaltan-resumes-pradeep-jhanjane

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ -   फलटण तालुक्यातील जावली येथील डिपी एक महिन्यापासून नादुरुस्त असलेबाबतची तक्रार रामचंद्र गावडे यांनी फलटण येथील प्रजा गटाच्या जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रदीप झणझणे यांचेकडे केली होती. सदर तक्रारीनंतर प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणच्या बरड विभागाशी संपर्क साधला व त्यांना शेतकऱ्यांच्या शेतपीकांच्या समस्येबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली.

    प्रजा गटाच्या माध्यमातून प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी जावली येथील डिपी तात्काळ बसवण्यात आला. शेतकरी रामचंद्र गावडे यांनी फलटण तालुका प्रजा गटाचे व फलटण वीज महावितरणचे आभार व्यक्त केले.

    प्रदीप झणझणे मागील प्रदीर्घ कालावधीपासुन फलटण तालुक्यातील शेतक-यांच्या व नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी निस्वार्थीपणे लढा देत आहेत. तसेच फलटणकरांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रदीप झणझणे व प्रजा गट यांचे विषयी आनंद व समाधान असल्याची भावना फलटण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत असतात.

No comments