प्रवासी महिलेचे १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - एसटी बस मध्ये प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे अंगठी असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सौ उषा मदन बागवडे, वय 47 वर्षे, रा.बुध, ता खटाव, जि सातारा या औरंगाबाद सांगली गाडीने फलटण मार्गे बुध तालुका खटाव येथे जाण्यासाठी एसटी बस मधून येत होत्या. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फलटण एस.टी. स्टँऩ्डवरती बसमधुन उतरत असताना, सौ.बागवडे यांना अचानक गुंगी आली, त्या गुंगीतच एस टी स्टँऩ्डवरील बाकडारती उतरुन खाली बसल्या असताना, शेजारील बायकांनी तुम्हाला काय होते आहे, असे विचारुन तुमच्या गळ्यातील मंगळसुत्र कोठे आहे, असे विचारले त्यावेळेस सौ.बागवडे यांना लक्षात आले की, गळ्यातील २१ ग्रॅम वजनाचे व ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसुत्र व उजव्या हाताच्या बोटातील ४ ग्रॅम वजनाची १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख २ हजार रुपये किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने एस.टी. बसमधुन उतरण्याच आधीच काढुन चोरुन नेला आहे. अधिक तपास सहायक फौजदार अनिल भोसले करीत आहेत.
No comments