Breaking News

ग्राहकांसाठी गुणवत्ता व पशुपालकांचे हित हेच गोविंदचे उद्दिष्ट – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Govind's aim is quality for customers and interests of cattle breeders - Shrimant Sanjivraje Naik Nimbalkar

    फलटण शहर ता. २० : पशुपालकांचा दुग्धव्यासाय अधिक फायदेशीर व सुखकर होण्यासाठी गोविंद डेअरी सातत्याने प्रयत्न करत असून जनावरांची उत्पादकता वाढावी , पाशुपालकाचे कष्ट कमी व्हावेत व यातून निर्माण होणारे दुध हे  अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावे व यातून ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी गोविंद आग्रही राहील व ग्राहकांसाठी गुणवत्ता व पशुपालकांचे हित या दृष्टी कोनातून वाटचाल चालू ठेवील असे प्रतिपादन गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कच्या संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    गोविंद डेअरीची स्थापना ही पशुपालकांचे हित समोर ठेउनच केली आहे. गोविंदचे व्यवस्थापन गरजेप्रमाणे नवनवीन योजना राबवत असून, त्याचा चांगला फायदा पशुपालकांना होत आहे. महिलांचेही योगदान या व्यवसायात वाखाणण्याजोगे आहे. येथील आरोग्यवर्धक दुधाची साठवण व वाहतूक यासाठी चांगली दक्षता घेतली जाते. दुधाची प्रक्रिया करून त्याचे उपपदार्थ तयार करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारल्याने आपण आज उच्च गुणवत्तेचे पदार्थ तयार करत असून, त्यास बाजार पेठेत ग्राहकांची मोठी मागणी आहे. आपल्या कामकाजाची दखल घेऊनच इंडियन डेअरी असोशिएशन यांनी हैद्राबाद या ठिकाणी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच गोविंदला गौरविण्यात आले असल्याचेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

    यावेळी दूध उत्पादक, केंद्र चालक, पशु पालक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर जगताप यांनी केले. आभार डॉ. शांताराम गायकवाड यांनी मानले.

No comments