प्रभाग क्र. ३,४,५ येथे मा.खा.रणजितसिंह यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक ३,४ व ५ मलठण मधील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ दि.२६ रोजी सकाळी ९ वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. नरसिंह निकम हे राहणार असून,याप्रसंगी मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, बाळासाहेब भोसले, अशोकराव भोसले, मोहनराव रणवरे, दादासाहेब भोसले, दत्तराज व्हटकर, नारायण बाबर, राजेंद्र नागटीळे, तानाजी करळे, बाळासाहेब घनवट, शरद सोनवणे, निलेश उर्फ बबलु पवार, ॲड.अनिल फाळके, सुनिल घोलप,रवींद्र माने, श्रीधर माने, संजोग उर्फ आप्पा माने उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग क्र.३,४,५ मध्ये दि.२६/९/२०२४ रोजी लोहार गल्ली येथे - सिमेंट काँक्रिटीकरण भूमिपूजन सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे. गणेशनगर येथे सिमेंट काँक्रिटीकरन भूमिपूजन ९.४५ वाजता, ढोर गल्ली येथे बंदिस्त काँक्रिट गटर भूमिपूजन १० वाजता, संतोषीमाता रोड - रस्ता डांबरीकरण करणे - १०.४५ वाजता, सगुनामातानगर येथे १० लाख लिटर पाण्याची नविन टाकी बांधणे - १०.३० वाजता भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ मिना नेवसे, सौ मदलसा कुंभार,सौ जयश्री बाबर यांनी दिली आहे.
No comments